|| आरती|

दत्तात्रेयाची आरती

त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा | त्रिभुवनी आवतार त्रैलोक्य राणा |
नेति नेति शब्द न ये अनुमाना | सुरवर मुनिवर योगी समाधि न ये ध्याना || 1 ||
जय देव जय देव जय सद्गुरू दत्ता | आरती ओवाळिता हरसि भवचिंता ||धृ0||
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त | अभाग्यासि कैचि न कळे ही मात |
पराही परतली तेथे कैंचा हा हेत | जन्म मरणाचा पुरलासे अंत || 2 || जयदेव जयदेव ||
दत्त येवोनिया उभा ठाकला | सद्भावें साष्टांगें प्रणिपात केला |
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला | जन्ममरणाचा फेरा चुकवला || 3 || जयदेव जयदेव ||
दत्त दत्त ऐसें लागले ध्यान | हारपले मन झाले उन्मन |
मीतूंपणाची झाली बोळवण | एका जनार्दनी श्रीदत्तध्यान || 4 || जयदेवजयदेव ||

नरसिंह सरस्वतींची आरती

कृष्णा पंचगंगा संगम निजस्थानI चरित्र दावुनि केले गाणगापुरीं गमनI
तेथे भक्तश्रेष्ठ त्रिविक्रम यति जाणI विश्वरूपें तया दिधले दर्शनII1II
जय देव जय देव जय सद्गुरू दत्ताI नृसिंहसरस्वती नामे जय विश्वंभरित्याII धृ0II
वंध्या साठी वर्षे पुत्रनिधानI मृत ब्राह्मण उठवीला तीर्थ शिंपून I
वांझ महिषी काढवी दुग्ध दोहूनI अंत्यजाचे मुखी निगम संपूर्णI जयदेव0II 2 II
शुष्क काष्ठीं पल्लव दावुनि लवलाहीI कुष्ठी ब्राह्मण केला सुंदर निज देहीI
अभिनव लीला त्यांची वर्णू मी काईI म्लेच्छ राज येउनि वंदी तव पायीII जयदेव 0II 3 II
दिपावळीचे दिवशी भक्त येवोनिI आठही जण मस्तक ठेविती तव चरणीI
आठही ग्रामीं भिक्षा केली ते दिनींI निमिषमात्रें तंतुका नेला शिवचरणीIजयदेव 0II 4 II
ऐसे चरित्र दावुनि जडमूढः उध्दरिलेI भक्तवत्सल ऐसे ब्रीद मिरविलेI
अगाध महिमा म्हणुनि वेदश्रुति बोलेI गंगाधर तनय वंदी पाऊलेंII जयदेव 0II 5 II

श्री दत्तात्रेयाची आरती

करितो प्रेमें तुज निरांजन स्थिरवुनियां मनI दत्तात्रेया सद्गुरूवर्या भावार्थे करूनIIधृoII
धरणीवर नर पीडित झाले भवरोगें सर्वI कामक्रोधादिक रिपुवर्गे व्यापुनि सगर्वI
योगयाग तप दान नेणती असताही अपूर्णI सुलभपणे निजभजने त्यांसी उध्दरि जो सर्वII1II
अत्रिमुनीच्या सदनी तीनी देव भुके येतीIभिक्षुक होऊनि अनुसूयेप्रति बोलती त्रयमूर्तीI
नग्न होऊनि आम्हांप्रती द्या अन्न असे म्हणतीI परसुनि होऊनि नग्न अन्न दे तव ते शिशु होतीII 2 II
दुर्वासाभिध मौनी जाहला शंभु प्रथमेंद्रI ब्रह्मदेव तो जाहला चंद्र जाहला तोउपेंद्रI
दत्तात्रय तो वीतनिद्र तो तारक योगिंद्रI वासुदेव यच्चरण चिंतुनी हो नित्य अतेंद्रII3II

||श्री. प .प. श्रीवासुदेवानंद सरस्वतीची आरती ||

जयजय श्रीमदगुरूवर स्वामिन परमास्म हंसाII
वासुदेवानंद सरस्वती आरती तवहंसाII धृ0II
सो हं हंसः पक्षाभ्यां संचारीसी ह्काशेII
वासस्ते खलु लोके सत्ये क्रीडा तव मानसेII 1 II
मुक्ताहारो ब्रह्मवाहको वैराट रूपधरII
भक्तराज ह्त्ध्यात तमोह्त्स्वीकुरू मां च हरII 2 II
पक्षस्यैके वातेनैते भीत काऽकाद्याःII
पलायितास्ते द्रुतं प्रभावभ्दवंति चाट्टश्याःII 3 II
एवं सति खलु बालस्तेहं ग्रासितः कामाद्यैःII
मातस्त्वरया चौध्दर कृपया प्रेषितशांत्याद्यैःII 4 II
दासस्ते नरसिंह सरस्वति यांचे श्रीचरणमII
भक्तिश्रध्दे वासस्ते ह्दि सततं मे शरणमII 5 II

||श्री ब्रह्मानंदाची आरती||

जय जय ब्रह्मानंदसरस्वती जय सद्गुरूरायाI आरति करू या तिरूमलात्मजा या राघवतनयाI I धृ0 I I
नाम असे गोविंदराडू त्या सदनी शुभकालीI मंगलाद्रि या क्षेत्री जन्मे भारद्वाज कुलींI
रूधिरोद्गारी भाद्रपौर्णिमा जन्मतिथी झालीI प्रजोत्त्पत्ती या अब्दि शोभे बर्टुव्रतीकायाII 1 II जय0 II
युवसंवत्सरी बटुदीक्षेचा त्याग असे केलाI रामप्पा हे नाव घेऊनी पर्णी जानकिलाI
गृहर्स्थनियमे वागूनी आश्रमधर्मे चालविलाI स्वभानुवर्षी कृष्णासुत तो प्रसवे गुरूभार्याII 2 II जयदेव0II
जनकजननिचा पुत्रसतिचा वियोग मला घडलाI वैराग्याने विषय जिंकुनि दत्तपती गढलाI
मन्मथ नामक अब्दा गुरू हा संन्यासी झालाI तीर्थे करि आसेतुहिमाचल संता सेवायाII 3 II जयदेव 0II
महाराष्ट्री निजयोगभ्यासी तन्मय होवोनीI पंढरपुरिच्या पुण्य भूमिवर मठ तो स्थापोनीI
जगद्गुरू ते शृंगेरीचे शिवाभिनव नमुनीI तद्नुग्रह तो होता लागे भाग्यचि उमजायाII 4 I जयदेव0 II
सिंहनगरी गुरूदत्त मठातें स्थापी गुरूमूर्तिI रामरताची हनुमंताची करी प्रतिष्ठा तीI
राजमहेंद्री मठ बांधोनी गोदेच्या प्रांतीI हरिद्वारि मठ उभवी जीवा या उध्दरायाII 5 II जयदेव0 II
बदरी नारायण केदार श्रीविधिजा स्थापीI केशवादि चाळीस यतींना यतीदीक्षा ओपीI
गृहस्थ षटशत् शिष्य तयांना रीत कथी सोपीI 'दत्त सर्वतोमुख' या यागा करी भक्त कार्याII 6 II जयदेव0 II
काश्मिराधिप नेपाळेश्वर जटत्पोल नृपतीI नृसिंह सीता दत्तकपुत्रा या गुरूला ध्यातीI
योर्गज्ञान प्रबोध मार्गे मुक्त भवी करितीIगहिंवर दाटे सद्गुर्रूमहिमा जाता वानायाII 7 II जयदेव0 II
वासुदेवयति ज्याते मानि निजपंचप्राणI गरूडेश्वरी श्रीदेवालय करि गुरूकरवीं पूर्णI
समाधीकाला लांबविले त्यासाठी जाणI नवग्रहाते स्थापी सज्जन अवगे तारायाII 8 II जयदेव0 II
आंध््रा द्राविड गीर्वाणहून त्या भाषा बहुपरिच्याI वदनी खेळति सहजपणे त्या उक्ती बोधाच्याI
मंत्रतंत्र यंत्रादि साधनें ॠध्दिसिध्दि गुरूच्याI चरणि लोळती तुझ्या सदोदित पावन की व्हायाII 9 II जयदेव0 II
गहन तुझे हे दयाळा वर्णाया पारIवरूणसंगमी योगिराज गुरूदत्त चिदाकारI
तुवा स्थापिला नमो नमो तुज अव्यय अविकारI कृपाहस्त दे मायबहिणी गे दासांते तुझियाII 10II जयदेव0 II

||पूज्य श्री नानामहाराजांची मंगल आरती||

जय सद्गुरूनाथा दयाळा मार्तण्डनाथाI
हृदय-निरांजन उजळुनी करू आरती आताII ॐ जय सद्गुरूनाथाII धृo II
भावबळे जिंकुनिया, वासुदेव दाताI
स्वामी तुम्हीI बाळपणांतचि आणिला,अमृतघट हाताII 2 II
ॐ जय सद्गुरूनाथाII
देहवीणा तव गाते करूणाघन दत्ताI निरंतर करूणाघन दत्ताI
दत्तस्वरूप तुम्ही नानाI भक्तांच्या चित्ताII 3 II
ॐ जय सद्गुरूनाथाII
सत्यनिष्ठ निजजीवनी कर्मयोग युक्ताI
स्वामी तुम्ही कर्मयोगयुक्ताIभजनि नित आळविता, भक्तीच्या पंथाII 4 II
ॐ जय सद्गुरूनाथाII
प््रोममधुर तव वाणी शरणांगत भक्ताI
विसावा शरणागत भक्ताI शांतिक्षमामय तुमचा आश्रय या जगताII 5 II
ॐ जय सद्गुरूनाथाII
मंगलमय तव चरणी जे ठेविती माथाI
निरंतर जे ठेविती माथाI भयहर्ता तू त्यांना दाविसी मोक्षपथाII 6 II
ॐ जय सद्गुरूनाथाII
चरणी आश्रय द्यावा,नित्य मला नाथा दयाळा नित्य मला नाथाI
विजय वैखरी पावन, गाऊनी तव गाथाII 7 II
ॐ जय सद्गुरूनाथाII
II अवधूत चिंतन श्रीगुरूदेव दत्तII

||श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वतीकृत श्रीदत्ताची आरती||

आरती ओवाळू अनसूयात्रितनया श्रीगुरूदत्तात्रेया अारती ओवाळू||ध्रृ0||
सर्वांतरीचे जे निजगुज साक्षी भूतची तेजीसंसार वृक्षाचे अधिबिज तो हा सद्गुरूराज||
विरज ब्रह्मजया म्हणति तया सद्गुरू दत्तात्रेया||1||आरति ओवाळू||
सात्त्वि हृदय हे आरती||तेज कर्माच्या वाती||विवेक स्नेहात त्या निगुती||
भिजवूनि ज्ञान ज्योति||पाजळुनी पेटविल्या||ओवाळाया श्रीगुरूदत्तात्रेया||2||आरति ओवाळू||
आरति उजळिता या चित्ता||मध्ये तिळभर ध्याता||
वावहि नच मिळता||दृश्यता आलि निमेश न जाता||
सोहं प्रकाश का हो खया||श्रीगुरू श्रीगुरूदत्तात्रेया||3||आरती ओवाळू||
प्रकाश आरतीचा हा थोर||सबाहय अभ्यंतर||
मी तूच पण हाचि अंधकार ज़ाळुनी झळके फार||वेगळा वासुदेवा||तेथुनिया||नोहे श्रीगुरूदत्तात्रेया||4||आरति ओवाळू

||शेजारती-( आरती )||

नृसिंहसरस्वतीI मनी धरूनिया प्रीतीII ओवाळितो शेजारतीI अंगीकारा यतिपतीII धृ0 II
ब्रह्या येऊनि देवेदेवाI म्हणे कोणा कोणा जीवाI
उपजवू कोठे केव्हाI संदेश हा मज व्हावाII नृसिंह0 II 1 II
विष्णुही येऊनीयाII आज्ञा मागे वंदूनीयाI
कोण जीवा काय खायाII कैसे देऊ कवण्या ठायाI नृसिंह0 II 2 II
येऊनिया महादेवI वंदूनी या पायद्वंद्वI ज्ञान कोणा देऊ देवाI
आज्ञा करा स्वयंमेवII नृसिंह0 II 3 II
अम्बा म्हणे बाळा यतीI फार झाली असे रात्रीI
झोप लागो तुजप्रतीI भक्त रक्षुनी(रक्षणी) श्रम होतीII नृसिंह0 II4 II
विनविताती भक्तवृंदI सेवा घेवोनीया छंदीपूर्ण करी ब्रह्मानंदI
भीमापुत्र नंदस्कंदII नृसिंह0 II 5 II

||प्रदक्षिणा|

धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाचीII
झाली त्वरा सुरवरां विमान उतरायचीII धृ0II
पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी
सर्वही तीर्थे घडली आम्हा आदि करूनि काशीII 1 II
मृदंग टाळ घोळ भक्त भावार्थे गाती
नाम- संकीर्तने ब्रम्हानंदे नाचतीII 2 II
कोटी ब्रम्हहत्या हरती करिता दडंवतI
लोटांगण घालितां मोक्ष लोळे पायातII 3 II
गुरूभजनाचा महिमा न कळे आगमा- निगमांसिI
अनुभव ते जाणती जे गुरूपदिचे रहिवासीII 4 II
प्रदक्षिणा करूनि देह भावे वाहिलाII
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिलाII